Ad will apear here
Next
गोयल गंगा फाउंडेशनच्या वतीने कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव
मुष्टीयोद्धा कोमल  बेलखेडे यांना सन्मानित करताना अतुल गोयल, गीता गोयल आणि सलोनी गोयल
पुणे : स्वबळावर स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांचा  गौरव गोयल गंगा फाउंडेशनच्यावतीने करण्यात आला.  गंगा ग्लिटझ येथे आयोजित करण्यात आलेल्या रास दांडिया सोहळ्यात गीता गोयल यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, तुळशीचे रोप देऊन या महिलांना सन्मानित करण्यात आले.
 
सातारा येथील बॉक्सींग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या कोमल बेलखेडे या तरुणीने खडतर परिस्थितीवर मात करत बॉक्सिंगमध्ये प्राविण्य मिळवत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

आशा मोरे व सविता भोसले यांना सन्मानित करताना अतुल गोयल, गीता गोयल आणि सलोनी गोयल
पर्यावरणप्रेमी व दिव्यांगासाठी काम  करणाऱ्या सुषमा भालेराव या चित्रकार आहेत. विविध सामाजिक उपक्रमात त्या हिरीरीने सहभाग घेतात. अक्षरस्पर्श संस्थेच्या माध्यमातून समाज कार्य करणाऱ्या दिपाली निखील या स्वतःच्या खर्चातून दिव्यांग मुलांचा सांभाळ करतात. आशा मोरे व सविता भोसले या महिलांना दुचाकी व चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देतात. डी. वाय. पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ने-आण करण्याचे काम आत्मियतेने करतात.  

गोयल गंगा फाउंडेशनच्या विश्वस्त गीता गोयल म्हणाल्या,  या स्त्रियांनी स्वतःच्या कार्यातून ओळख निर्माण केली आहे. समाजातील प्रत्येक स्तरात कर्तृत्ववान स्त्रिया कार्यरत असताना दिसतात. कोणतीही आशा, अपेक्षा न ठेवता काम करणाऱ्या, प्रसिध्दीपासून दूर असलेल्या गुणवंत स्त्रियांचा सन्मान व्हायला हवा यासाठीच आम्ही गोयल गंगा फाउंडेशनच्यावतीने त्यांना सन्मानित करत आहोत. समाजात सकारात्मक भावना वाढीस लागावी हा या पुरस्कारामागचा हेतू आहे. 
 
या वेळी सलोनी  गोयल, अतुल गोयल, जयप्रकाश गोयल आणि बॉईज चित्रपटातील कलाकार दिग्विजय जोशी उपस्थित होते. रास दांडिया स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित महिलांनी जागेगी नारी, तो जागेगा इंडिया असा जयघोष करत सन्मानित करण्यात आलेल्या महिलांच्या कर्तृत्वाला टाळ्यांच्या गजरात दाद दिली. दिग्विजय जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZNSBG
Similar Posts
‘ग्रामीण भागात ज्ञानगंगा पोहोचविणे हे खरे आव्हान’ पिंपरी : ‘शिक्षण क्षेत्राची शहरी भागात होत असलेली प्रगती कौतुकास्पद आहे पण ग्रामीण भागातील जनतेपर्यंत ज्ञानगंगा पोहोचविण्याचे खरे आव्हान सरकार तसेच शिक्षण संस्थांच्या पुढे आहे. यासाठी केरळ सारख्या राज्याचा आपल्याला आदर्श असून यावर आपण एकत्रित प्रयत्न केले पाहिजे’, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे व्यक्त केले
‘विद्यार्थ्यांवर त्यांचे भवितव्य लादू नका’ पिंपरी (पुणे) : ‘शिक्षण क्षेत्रातील समस्यांना सामोरे जाताना,पालकांची मानसिकता बदलणे हे प्रमुख आव्हान आपल्या देशासमोर आहे. पुढची यशस्वी तरुण पिढी घडवण्यासाठी पालकांनी मुलांवर त्यांचे भवितव्य लादू नये’, असे मत शिक्षण तज्ज्ञांनी येथे व्यक्त केला. निमित्त होते गोयल गंगा फाउंडेशनच्या वतीने गोयल गंगा इंटनॅशनल
‘पर्यावरणाचा समतोल राखण्याची जबाबदारी सर्वांची’ पुणे : ‘पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असून, सध्याचा ढासळता समतोल लक्षात घेता जास्तीत जास्त प्रमाणात वृक्ष लागवड करून त्याच्या संवर्धनाची आवश्यकता आहे,’ असे मत गोयल गंगा फाउंडेशनच्या विश्वस्त गीता गोयल यांनी केले.
‘गोयल गंगा’तर्फे विशेष मुलांसाठी आंबा फेस्टचे आयोजन पुणे : आंब्याचा गोडवा समाजातील वंचित मुलांना चाखता यावा यासाठी नगर रोड येथील चोखी दाणी येथे गोयल गंगा फाउंडेशनतर्फे ‘आंबा फेस्ट’चे आयोजन करण्यात आले होते. यात ४५०हून जास्त चिमुरडयांनी आंब्याचा मनमुराद आनंद लुटला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language